नवी दिल्ली – नुकतीच पोलिसांसाठी महत्त्वाच्या समजल्या जाणा-या राष्ट्रपती पदकांची घोषणा करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या पदकांची घोषणा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून करण्यात आली आहे. यात सर्वात विशेष गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील 57 पोलिसांनी ह्या राष्ट्रपती पोलीस पदकांवर मोहोर उमटवली आहे. राज्यासाठी ही अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. राष्ट्रपती पोलीस पदकांच्या या घोषणेची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत असतात. या पदकांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. पुण्याचे सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांचा देखील यामध्ये समावेश आहे.
राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा
महाराष्ट्रातील ५७ पोलिसांना #राष्ट्रपतीपोलीसपदक
४ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक
राज्यातील १३ पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस शौर्य पदक
तर
राज्याला ४० पोलीस पदक pic.twitter.com/t0hSAjc142— महाराष्ट्र परिचय केंद्र (@MahaGovtMic) January 25, 2021
राष्ट्रपती पोलिस पदक महाराष्ट्रातील ज्या 57 पोलिसांना मिळाले आहेत, त्यात 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक, राज्यातील 13 पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस शौर्य पदक तर राज्याला 40 पोलीस पदक मिळाले आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती जनतेसाठी दिवसरात्र झटणा-या पोलिसांसाठी पदकांच्या स्वरुपात त्यात अविरत कामाला सलाम करण्यासाठी ही पदके दिली जातात. वेळप्रसंगी आपल्याला कुटूंबाला दूर लोटून इतरांचे कुटूंब सुरक्षित राहावे म्हणून स्वत:च्या घरापासून दूर राहतात. अशा पोलिसांना या पदकांच्या स्वरुप त्यांच्या अमूल्य योगदानाची प्रशंसा करण्यासाठी यापेक्षा दुसरे चांगले माध्यम असूच शकत नाही. यासह राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार देखील घोषित करण्यात आले आहेत. यात 4 मुले आणि एका मुलीचा समावेश आहे.