प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी या खास ठिकाणांना नक्की भेट द्या

26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीमध्ये भव्य परेडचे आयोजन करण्यात येते. देशभरातून लोक परेड बघण्यासाठी जातात. जर तुम्ही देखील प्रजासत्ताक दिनाला दिल्लीत असाल तर देशभक्तीचा हा खास संगम बघण्यासाठी नक्की जा. आज भारतातील काही खास ठिकाणं तुम्हाला सांगणार आहोत, जेथे प्रजासत्ताक दिनी नक्की भेट द्यायला हवी.

Image Credited – Navbharattimes

लाल किल्ला आणि इंडिया गेट –

प्रजासत्ताक दिनाचा उत्साह अनुभवण्यासाठी दिल्लीशिवाय दुसरी जागा नाही. परेडसोबतच या दिवशी लाल किल्ला आणि इंडिया गेटला देखील तुम्ही भेट देऊ शकता.

Image Credited – Navbharattimes

नॅशनल वॉर मेमोरियल, दिल्ली–

इंडिया गेट जवळीलच नॅशनल वॉर मेमोरियलला नक्की भेट द्यायला हवी. अनेक राज्यांमध्ये युद्ध स्मारक आहे, मात्र राष्ट्रीय स्तरावरील हे पहिले युद्ध स्मारक आहे.

Image Credited – Navbharattimes

जालियनवाला बाग मेमोरियल , पंजाब

जालियनवाला बागमध्ये 11 एप्रिल 1919 ला जनरल डायरने बेछुट गोळ्या झाडून अनेक नागरिकांना मारले होते. या जागेला ऐतिहासिक महत्त्व आहे.

Image Credited – Navbharattimes

चंद्रशेखर आझाद पार्क, प्रयागराज –

प्रयागराजच्या कंपनी गार्डनमध्ये शहीद चंद्रशेखर आझाद पार्क आहे. या पार्कला अल्फ्रेड पार्क देखील म्हटले जाते. येथेच 27 फेब्रुवारी 1931 ला इंग्रजांच्या सैन्यांनी स्वातंत्र्य सैनिक चंद्रशेखर आझाद यांना घेरले होते. यावेळी आझाद यांनी शरणागती न पत्करता स्वतःला गोळी मारली होती.

Image Credited – Navbharattimes

झांशीचा किल्ला, उत्तर प्रदेश –

राणी लक्ष्मीबाईच्या साहसाचे प्रतिक असलेल्या या किल्ल्याला प्रजासत्ताक दिनी नक्की भेट द्यावी.

Image Credited – Navbharattimes

कारगिल वॉर मेमोरियल –

कारगिल वॉर मेमोरियलची स्थापना भारतीय सैन्याने कारगिल युद्धानंतर केली होती. मेमोरियलच्या एका भितींवर युद्धात शहीद झालेल्या सैनिकांची नावे लिहिण्यात आली आहेत.

Image Credited – Navbharattimes

नेताजी भवन, कोलकाता –

कोलकातमधील नेताजी भवनात स्वातंत्र्य सैनिक सुभाष चंद्र बोस यांच्या जीवनावर समर्पित एक स्मारक आणि संशोधन केंद्र आहे. हे भवन 1909 ला बोस यांच्या वडिलांनी उभारले होते.

Image Credited – Navbharattimes

साबरमती आश्रम, अहमदाबाद –

या आश्रमातून महात्मा गांधी यांनी मीठाचा सत्याग्रह आणि दांडी यात्रेची सुरूवात केली होती. या जागेला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे या आश्रमाला भेट देणे नक्कीच सुखद अनुभव असेल.

Image Credited – Navbharattimes

वाघा बॉर्डर, अमृतसर –

पंजाबच्या वाघा बॉर्डरवर दररोज सुर्यास्ताच्या आधी रिट्रीट सेरिमनी होते. यामध्ये भारत व पाकिस्तानचे जवान सहभागी होतात.

Image Credited – Navbharattimes

सेलुलर जेल, अंदमान निकोबार –

अंदमान निकोबर बेटावरील सेलुलर जेलला काळेपाणी म्हणून ओळखले जाते. हे जेल एक म्यूझियम आणि स्मारक आहे. या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तुम्ही नक्की भेट देऊ शकता.

Leave a Comment