लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात कोरोना लस टोचून घेणार नरेंद्र मोदी !


नवी दिल्ली : लसीकरणच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना लस टोचून घेणार आहेत. 16 जानेवारीपासून देशभरात कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस दिली जात आहे. यानंतरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी लस टोकून घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. लसीकरणाचा दुसरा टप्पा कधी सुरु होणार, पंतप्रधान लस केव्हा घेणार याची माहिती अद्याप समजू शकलेले नाही.

पंतप्रधान आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात लस दिली जाणार आहे. सामान्य लोकांमध्ये लसीबाबत विश्वास आणि जनजागृती पसरवण्यासाठी पंतप्रधान आणि इतर नेते लस टोचून घेणार आहे. लसीकरण मोहिमेची सुरुवात करताना मोदी म्हणाले होते की, दुसऱ्या टप्प्यात 50 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लस दिली जाईल. यानुसार पंतप्रधान मोदीही लस घेणार आहे. मोदींसह देशातील आणखी काही नेते उदाहरणार्थ गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर नेतेही लस घेणार आहेत.