एअरटेलच्या पेमेंट सर्विसला सुरुवात; असा कराल वापर


मुंबई : डिजिटल आणि UPI पेमेंटचा वापर देशात गेल्या काही दिवसांपासून वेगाने वाढत आहे. अनेक कंपन्यांनी हिच बाब लक्षात घेत पेमेंट सर्विस सुरु केल्या आहेत. व्हॉट्सअॅप, अॅमेझॉन यांचाही यामध्ये समावेश आहे. अशातच आता पेमेंट सर्विसच्या जगात टेलिकॉम कंपनी एअरटेलनेही पाऊल ठेवले आहे. Safe Pay नावाची सर्विस एअरटेल कंपनीने सुरु केली आहे. एअरटेलच्या ऑनलाईन बँकिंग सिस्टम एअरटेल Payments Bank च्या अंतर्गत ही सर्विस सुरु करण्यात आली आहे. कंपनीच्या वतीने दावा करण्यात आला आहे की, यामार्फत युजर्सना सेफ ट्रान्झॅक्शन करता येईल.

त्याचबरोबर एअरटेलच्या वतीने हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे की, युजर्सच्या सुरक्षेची काळजी एअरटेल Safe Pay मध्ये घेण्यात आली आहे. यामध्ये युजर्स सुरक्षित पद्धतीने पैसे ट्रान्सफर करु शकणार आहेत. हे टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सिस्टमहून उत्तम असल्याचे सांगण्यात येत आहे.

तसेच एअरटेलने यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, युजर्सला ऑनलाईन फ्रॉडपासून वाचवण्याच्या हेतून या सर्विसची सुरुवात करण्यात आली आहे. यामार्फत युजर्स कोणत्याही फसवणुकीशिवाय ट्रान्झॅक्शन करु शकतील. कंपनीच्या वतीने दावा केला जात आहे की, ही सेफ पेमेंट सर्विस आहे. त्याचसोबत ही फार सोपी प्रक्रिया आहे.

अशा प्रकारे कराल एअरटेल Safe Payचा वापर

  • एअरटेल Safe Pay ला एअरटेल Payments Bank मध्ये जाऊन सुरु करता येणार आहे.
  • त्यासाठी सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये एअरटेल Thanks अॅप ओपन करा.
  • आता स्क्रिनवर खाली Payments Bank ऑप्शन दिसेल, तिथे तुम्हाला क्लिक करायचे आहे.
  • एवढे केल्यानंतर तुमच्याद्वारे अॅर करण्यात आलेले अकाउंट सेफ पे स्टेट डिअॅक्टिवेटेड दिसून येईल.
  • जसे अकाउंटवर तुम्ही क्लिक कराल, तुम्हाला इनेबल सेफ पेचा ऑप्शन दिसून येईल.
  • हे इनेबल केल्यानंतर नेट बँकिंग आणि यूपीआय पेमेंट्स करण्यात येईल.
  • त्यानंतर प्रत्येक वेळी ट्रान्झॅक्शन केल्यानंतर अलर्ट मेसेज मिळेल आणि तुमच्या सहमतीनंतरच ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होईल.