राहुलची तुलना मोदीशी करणे चुकीचे- रामदेव बाबा

शिर्डी- काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना अजून राजकारणाचा अनुभव नाही. त्यंच्याकडे कसलीच दूरदृष्टी नाही. त्यामुळे नरेंद्र मोदींसारख्या अनुभवी नेत्याशी त्यांची तुलना करणे चुकीचे ठरेल.’ असे मत योगगुरू बाबा रामदेव यांनी व्यक्त केले.

शिर्डी येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना योगगुरू बाबा रामदेव म्हणाले, ‘पंतप्रधानपदासाठी इच्छुकाची रांग लागली आहे. नरेंद्र मोदी हेच सध्यातरी या पदासाठी योग्य आहेत. मोदींकडे विकासाची दृष्टी आहे. भ्रष्टाचार रोखण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे सध्या त्यंच्या पाठीमागे जनमत आहे. ,’

गेल्या काही दिवसात भ्रष्टाचार बोकळला आहे. सध्याचे पंतप्रधान मनमोहन सिंग हे प्रामाणिक आणि इमानदार असले तरी त्यांच्या काळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे हे विसरता येणार नाही, असेही योगगुरू बाबा रामदेव यांनी स्पष्ट केले.