राणी मुखर्जी झाली पोलिस ऑफिसर

यशराज फिल्म्सने काही दिवसापूर्वीच नवीन सिनेमाची घोषणा केली आहे. या सिनेमात अभिनेत्री रानी मुखर्जी मुख्य भूमिका करीत आहे. ‘मर्दानी’ या सिनेमात राणी मुखर्जी पोलिस ऑफिसरचा रोल करणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन प्रदीप सरकार करनार आहे. गेल्या काही दिवसापासून यशराज फिल्म्सचा सिनेमा म्हटले की अभिनेत्री म्हणून रानी मुखर्जी असे समीकरण तयार झाले आहे.

हा सिनेमा प्रमुख्याने वाईआरएफ या सिनेमावर आधारित आहे. अभिनेत्री रानी मुखर्जी ‘मर्दानी’ या सिनेमात पोलिस ऑफिसरची दमदार आणि सशक्त भूमिका करणार आहे. रानी सिनेमात पहिल्यादाच ऑफिसरचा रोल करीत आहे.

प्रदीप आणि रानी याने यापूर्वी यशराजच्या ‘लागा चुनरी में दाग’ या सिनेमात काम केले आहे. रानीने या सिनेमात दमदार भूमिका केली होती. ‘मर्दानी’ या सिनेमाची शूटिंग यावर्षी डिसेंबर महिन्यात होणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी रिलीज होनार आहे. या सिनेमाचे निर्माता म्हणून आदित्य चोप्रा काम करणार आहेत.

Leave a Comment