
दरवेळेस नवनवीन फिचर्स देऊन व्हॉट्सअॅप हे लोकप्रिय अॅप आपल्या युजर्संना खुश करत असते. आता एका नव्या फिचरचे टेस्टिंग व्हॉट्सअॅप करत असून या फिचरचे नाव मल्टी डिव्हाईस सपोर्ट असे असून व्हॉट्सअॅप यामुळे मल्टीपल डिव्हाईसेसवर वापरता येणे शक्य होणार आहे. दरम्यान, सर्वजण खूप काळापासून या फिचरची वाट पाहत होते. व्हॉट्सअॅपचे नवे फिचर ट्रॅक करणाऱ्या WABetainfo या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, या फिचरचे व्हॉट्सअॅप सध्या टेस्टिंग करत असून व्हॉट्सअॅप मल्टिपल डिव्हाईसेसवर सेटअप असल्यावर सुद्धा कॉल रिसिव्ह होऊ शकतो.
व्हॉट्सअॅपमध्ये लवकरच दाखल होणार multi-device support हे फिचर
WABetainfo ने ट्विटद्वारे व्हॉट्सअॅपच्या या फिचरबद्दल दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप अकाऊंट मल्टी डिव्हाईसवर कॉन्फिंगर करुन व्हॉट्सअॅपच्या कॉल्सची वेगवेगळ्या डिव्हाईसेसवरुन टेस्टिंग चालू आहे. अद्याप व्हॉट्सअॅपने या फिचरची रिलीज डेट सांगितलेली नाही. मल्टी डिव्हाईस फिचर अॅक्टीव्हेट झाल्यानंतर तुम्ही व्हॉट्सअॅप वापरत असलेल्या सर्व डिव्हाईसेसवर एकाच वेळी एक मेसेज येईल. त्यासोबत तुम्ही केलेल्या सर्व अॅक्शन्स, रिप्लाय, डाऊनलोड केलेल्या व्हिडिओज आणि इमेजेस सर्व डिव्हाईसवर सिंक राहतील.
व्हॉट्सअॅपने यापूर्वी QR कोड स्कॅन करुन डेक्सटॉपवर व्हॉट्सअॅप चालवण्याचे ड्युअल फिचर सादर केले होते. याच फिचरचे अपग्रेडेट व्हर्जन हे मल्टी डिव्हाईस सपोर्ट हे आहे. व्हॉट्सअॅप जवळपास वर्षभरापासून या नव्या फिचरवर काम करत आहे. WABetainfo ने यापूर्वी दिलेल्या रिपोर्टनुसार, तुम्ही चार वेगवेगळ्या डिव्हाईसवर एकाच वेळी व्हॉट्सअॅप अकाऊंट पाहू शकाल. विशेष म्हणजे प्रायमरी डिव्हाईस इंटरनेटला कनेक्टेड नसेल तरी इतर डिव्हाईसेसवर तुम्ही मेसेज सेंड किंवा रिसिव्ह करु शकता.
