नवी दिल्ली: बलात्काराची राजधानी बनलेल्या दिल्लीत न्यायालयाच्या आवारात महिलेवर वकिलांकडून सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघड झाली आहे.
न्यायालयात वकिलांकडून सामूहिक बलात्कार
घटस्फोटाच्या खटल्याबाबत चर्चा करण्यासाठी एका महिलेला तिच्या वकिलाने पतियाळा न्यायालयात बोलावून घेतले. तिथे कक्षा क्रमांक सहा मध्ये वकील आणि त्याच्या दोघा मित्रांनी या महिलेवर निर्घृण बलात्कार केला.
या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
