मला हळवे व्‍हायचे नव्हते – सचिन

नवी दिल्‍ली- युवराजने लिहीलेले ‘द टेस्‍ट ऑफ माय लाईफ’ पुस्‍तकाचे प्रकाशन नुकतेच झाले. या कार्यक्रमास सचिन तेंडुलकरसह टीम इंडियामधील सर्व खेळाडू आवर्जून उपस्थित होते. अष्‍टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग कर्करोगाशी लढून जिंकला. हा लढा सुरु असताना मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकर त्‍याला भेटायला लंडनला सपत्निक गेला होता. त्‍यावेळी सचिनला एकच भय होते. युवराजसमोर त्‍याच्‍या डोळ्यातून पाणी आले तर? कसे होईल. मात्र यामधून कसेबसे स्‍वतःला सावरले. युवराजसमोर मला हळवे व्‍हायचे नव्हते असे मत मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.

पुढे बोलताना सचिन म्हणाला, ‘कर्करोगा अमेरिकेत उपचार सुरु असताना मी युवराजला भेटण्यासाठी गेलो होतो. त्‍यानंतर तो लंडनला गेला होता. तेथे मी पत्नी अंजलीसह त्‍याची भेट घेतली. युवराजसमोर मला हळवे व्‍हायचे नव्हते. जेव्‍हा मी युवराजला भेटलो तेव्‍हा त्‍याला घट्ट मिठीत घेतले. त्‍याक्षणाला युवीला पाहून मला वाटले की तो लवकरच पूर्णपणे बरा होईल.

या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमास टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीही उपस्थित होता. धोनी म्‍हणाला, ‘ युवीने मला कर्करोगाबाबत सांगण्‍यापूर्वीच मला आजाराची माहिती होती. त्‍याच्‍या तपासण्‍यांचा अहवाला आल्‍यानंतर एका जणाने मला सांगितले की युवीला कर्करोग आहे. मी त्‍याला पुन्‍हा विचारले. तेव्‍हा हे खरे असल्‍याचे त्‍या व्‍यक्तीने सांगितले होते. त्यामुळे मी काही काळ खचलो होतो.’ या प्रसंगी युवीने मैदानावरील काही आठवणी सांगितल्‍या. वन डे विश्‍वचषक स्‍पर्धेतील कामगिरी सदैव लक्षत राहील असे त्यने स्पष्ट केले.

Leave a Comment