आबांचे सावध ‘कदम’; सीसीटीव्ही फुटेज पहिले नाही

मुंबई – विधानभवनात मंगळवारी आमदारांकडून पोलिस अधिका-याला बेदम मारहाण झाली. आमदारांच्या मारहाणीत जखमी झालेले पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांची विचारपूस करण्यासाठी आबांनी बुधवारी सेंट जॉर्जेस रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी मारहाणीचे सीसीटिव्हीचे फुटेज मी पाहिलेले नाही. तपास अधिका-यांनी ते पाहिले आहे,’ असे सांगत आबांनी काढता पाय घेतला. या प्रकरणी १२ जणांवर तपास अधिका-यांनी गुन्हे दाखल केले असल्याचे त्यांनी सांगितले.

तसे पहिले तर नेहमीच गुन्हेगारांना सोडणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगणारे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील याप्रकरणी मात्र सावधपणे ‘कदम’ टाकत आहेत. आमदारांच्या मारहाणीत जखमी झालेले पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांची विचारपूस करण्यासाठी आबांनी बुधवारी सेंट जॉर्जेस रुग्णालयाला भेट दिली. यावेळी पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देताना या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आपण अद्याप पाहिलेले नसल्याचे आबांनी म्हटले. तपास अधिका-यांनी ते पाहिले असून त्यानुसार त्यांनी गुन्हा दाखल केला असल्याचे म्हटले आहे.’ एवढे सांगून त्यांनी पत्रकाराशी अधिक बोलणे टाळले. त्यानंतर ते लगेचच दवाखाण्यातून बाहेर पडले.

Leave a Comment