पुन्हा मनसैनिकांची परप्रांतीयांना मारहाण

सातारा: सैनिक स्कूलमध्ये बनावट कागदपत्राच्या आधारे प्रवेश घेत असल्याचा आरोप करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बिहार आणि उत्तर प्रदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मारहाण केली.

सातारा येथील एका रुग्णालयाच्या बाहेर हा प्रकार घडला. देशभरात प्रसिद्ध असलेल्या सैनिकी शाळेत प्रवेश घेण्यासाठी काही विद्यार्थी आपल्या पालकांसमवेत सातारा येथे आले होते.

मात्र या विद्यार्थ्यांचे पालक बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन आपल्या पाल्यांना सैनिकी शाळेत दाखल करीत असल्याचा आरोप करून मनसैनिकांनी त्यांच्यावर हल्ला चढविला.