हैदराबाद- पहिल्या कसोटीत पराभूत झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने शुक्रवारी हैदराबादेत जोरदार सराव केला. टीम इंडियानेसुद्धा यावेळी कसून सराव केला. भारताकडून कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकरसह सर्व खेळाडूंनी सराव करीत आगामी सामन्यासाठी काही नवीन डावपेच अमलात आणले आहेत.
पहिल्या कसोटीच्या वेळीसुद्धा वॉर्नर पोटाच्या त्रासामुळे त्रस्त होता. वॉर्नरशिवाय ऑस्ट्रेलियाच्या उर्वरित संघाने हैदराबादेत जोरदार सराव केला आणि बहुतेक कांगारू हैदराबादच्या खेळपट्टीने समाधानी दिसले. पोटाच्या त्रासामुळे ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर सरावाला अनुपस्थित होता. मात्र इतर खेळाडूंनी कसून सराव केला.
चेन्नई कसोटीत पराभूत झाल्यानंतर कांगारूंने चिंतन करण्यास सुरूवात केली आहे. ही खूप चांगली खेळपट्टी आहे. येथे चेंडूला उसळीसुद्धा मिळते. मात्र, फिरकीपटूंसाठीसुद्धा खेळपट्टी महत्त्वपूर्ण सिद्ध होईल. पहिल्या दोन दिवसानंतर खेळपट्टी फिरकीला साथ देणार असल्याने नाणेफेक जिंकाल्यानंतर फलंदाजी घेण्याकडे त्यांचा कल असणार आहे.