
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आता आपल्याला नवीन भूमिकेत पाहायला मिळणार आहे. लवकरच डिजिटल प्लॅटफॉर्मवर सानिया दिसणार आहे. ‘एमटीव्ही निषेध अलोन टूगेदर’ या वेब सीरिजद्वारे सानिया अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. टीबीविषयी जनजागृती करणे या शोचा हेतू आहे. सानिया यात स्वत: दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
वेब सीरिजद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार टेनिस स्टार सानिया मिर्झा
एका निवेदनात सानियाने म्हटले आहे की, आपल्या देशातील सर्वात जुनी टीबी ही आरोग्य समस्या आहे. 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये टीबीची नोंद केलेली निम्मी प्रकरणे आहेत. रोगाचा सामना करण्याची लोकांच्या मनातील टीबी विषयीचे गैरसमज दूर करण्याची नितांत गरज आहे. ती पुढे म्हणाली, की लोकांना ‘एमटीव्हीवरील निषेध अलोन टूगेदर प्रभावी पद्धतीने जागरुक करत आहे. आजचे तरुण अधिक जागरूक, संवेदनशील असल्याचे सानिया म्हणाली.
टीबीचा धोका सध्याच्या साथीच्या आजारांमुळे अधिक वाढला आहे. परिणामी पूर्वीपेक्षा अधिक कठीण टीबी विरोधातील लढाई झाली आहे. यामुळे या प्रकल्पात सहभागी होण्याची मला प्रेरणा मिळाली. मला आशा आहे की माझ्या प्रयत्नामुळे काही सकारात्मक बदल घडतील. हा विकी आणि मेघा या तरुण जोडप्यांच्या आव्हानांबद्दल शो आहे. विकीची भूमिका सय्यद रझा आणि मेघाची भूमिका प्रिया चौहान यांनी केली आहे.
लॉकडाऊन दरम्यान तरुण जोडप्यांना होणाऱ्या आव्हानांवर शोमध्ये सानिया मिर्झा चर्चा करताना दिसणार आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एमटीव्ही इंडिया आणि एमटीव्ही निषेधच्या सोशल मीडिया हँडलवर 5 एपिसोडची मालिका सुरू होईल. यावर्षी जानेवारीत टीव्ही शो एमटीव्ही निषेधचा प्रीमियर झाला होता. शोमध्ये टीबीविषयी जागरूकता आणि योग्य औषधे घेण्याचे महत्त्व दर्शविले गेले.
