
फराह खान दिग्दर्शित आणि अभिनेता शाहरुख खानच्या ‘ओम शांति ओम’ या चित्रपटाद्वारे अभिनेत्री दीपिका पादुकोणने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. दरम्यान दीपिकाने बॉलीवूडमधील आपली 13 वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत. याकाळात दीपिकाने एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट दिले. सध्याच्या घडीला ती बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
‘पठाण’साठी दीपिका घेणार आतापर्यंतचे सर्वाधिक मानधन!
बॉलीवूडची डिंपल गर्ल अर्थात दीपिका पादुकोण पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिची ही चर्चा यशराज फिल्म्स निर्मित आगामी चित्रपट ‘पठाण’ संदर्भात सुरु आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत.
सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शनात बनणारा चित्रपट एक अॅक्शन-थ्रिलर चित्रपट असणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटाबाबत असे सांगण्यात येत आहे की, हा चित्रपट आतापर्यंतचा बॉलिवूडमधील सर्वाधिक बजेट असणारा चित्रपट असणार आहे. अशातच आता दीपिकाने या चित्रपटासाठी घेतलेल्या मानधनासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘पठाण’साठी दीपिकाने जवळपास 14-15 कोटी रुपये घेतले आहेत. पुढच्या वर्षी या चित्रपटाची शुटिंग सुरु होणार आहे. ‘पठाण’ तयार करण्यासाठी जवळपास 200 कोटी रुपयांचं बजेट तयार करण्यात आलं आहे. हा बॉलिवूडचा आतापर्यंतचा सर्वात महागडा अॅक्शनपट असल्याचे सांगितले जात आहे.
