जावईबापूंचा सासरेबुवांना सल्ला; आता तरी पराभव मान्य करा


वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला असून डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन विजय झाले आहेत. जो बायडेन अमेरिकेचे 46वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. पण डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत झालेला पराभव अद्यापही मान्य करायला तयार नाहीत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी निकाल जाहीर होण्यापूर्वी निवडणुकांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. पण आता निकाल जाहीर झाल्यानंतरही ते आपला पराभव मान्य करायला तयार नाहीत. तसेच सतत जो बायडन यांच्याविरोधात ते अनेक वक्तव्य करत आहेत. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई आणि वरिष्ठ सल्लागार जॅरेड कूश्नर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यांनी आपले सासरे डोनाल्ड ट्रम्प यांना सल्ला देत, आपला पराभव मान्य करण्यास सांगितले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, आपले सासरे डोनाल्ड ट्रम्प यांना जॅरेड कूश्नर म्हणाले की, राष्ट्राध्यक्षांच्या निवडणूकीत डेमोक्रेटिक उमेदवार जो बायडन यांच्याकडून झालेला पराभव त्यांनी आता मान्य करावा. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जसे जो बायडन हे निवडणूक जिंकून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर काही वेळातच डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, तोपर्यंत मी आराम करणार नाही, जोपर्यंत अमेरिकी लोकांकडील ईमानदार मतांची मोजणी होत नाही आणि ही लोकतंत्राची मागणी आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या याच वक्तव्यानंतर त्यांचे जावई कूश्नर यांनी आपल्या सासरेबुवांना सल्ला दिला होता.