मृत्यूला अतिनैराश्य कारणीभूत नाही

tension
लंडन : नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या व्यक्ती कमी जगतात, असे म्हटले जाते. मात्र ब्रिटिश संशोधकांना ते मान्य नाही. सतत दु:खात बुडालेल्या वा निराश असलेल्या व्यक्ती सातत्याने आजारी पडतात किंवा त्यांचे आयुर्मान घटते, हे चुकीचे आहे.

सतत आनंदी असणा-या व्यक्तीनांही लवकर मृत्यू येऊ शकतो, असा दावा या संशोधकांनी केला आहे. आनंदी वा नैराश्य जीवनमानाचा मृत्यूशी काहीही संबंध नाही, असे निरीक्षण या संशोधकांनी अभ्यासातून नोंदविले आहे. दु:खी आणि तणावपूर्ण जीवनशैली विविध आजारांची लागण होण्यासाठी जबाबदार असल्याचा गैरसमज या संशोधनातून खोडून काढला आहे. अनारोग्य जीवनशैलीच व्यक्तीला सतत दु:खी करते. त्यामुळे असे वाटते की व्यक्ती दु:खी असल्यानेच सतत आजारी पडत आहे. आजाराने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तरी असे वाटते की सतत दु:खी असल्यानेच त्या व्यक्तीला मृत्यूला सामोरे जावे लागले, पण तसे नाही. सतत नैराश्य व दु:खाच्या गर्तेत अडकलेल्या कित्येक व्यक्ती दीर्घायुषी होतात, असा दावा या संशोधकांनी केला आहे.

हा दावा संशोधकांनी अनारोग्य जीवनशैली, धूम्रपान आणि राहणीमान तसेच सामाजिक आर्थिक कारणाच्या अभ्यासातील निरीक्षणातून केला आहे. ब्रिटनमधील अनेक व्यक्तींवर केलेल्या संशोधनातून संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे. ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स विद्यापीठाच्या बेट्टी लीयू यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले. संधोधकांनी गेली १० वर्षे सरासरी ५९ वयोमान असलेल्या सात लाख महिलांच्या जीवनशैलीचे निरीक्षण केले, त्यापैकी ३० हजार महिलांच्या मृत्यूमागील कारणांचा अभ्यास केला गेला. त्यातून समोर आलेल्या निष्कर्षांनुसार दु:खग्रस्त महिलांच्या आणि आंनदी महिलांच्या मृत्यूची टक्केवारी साधारणपणे समान असल्याचे समोर आले आहे. या वेळी दु:खी असण्याची काही कारणे नोंदवण्यात आली. त्यात दिली जाणारी वागणूक, धूम्रपान, व्यायामाचा अभाव आणि जोडीदारासोबत न राहण्यामुळे येणारा तणाव आदी मुख्य कारण असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment