भारताचा धावाचा डोंगर ; कांगारू संकटात

चेन्नई: कर्णधार धोनीच्या तुफानी खेळीमुळे भारताने चौथ्या दिवशी ५७२ धावाचा डोंगर उभा करून पहिल्या डावात कांगारूवर १९२ धावांची आघाडी घेतली आहे. शेवटचे दोन दिवस शिल्लक असून फिरकी गोलदाजांनी कमाल केली; तर कांगारू संघावर पराभवाचे संकट ओढविणार आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा ऑस्ट्रीलियाने दुस-या डावात तीन गडी बाद ६६ धावा केल्या होत्या.

दरम्यान कर्णधार महेंद्रसिंग धोनीने तुफानी खेळी करताना (२२४) करीत द्विशतक ठोकले. धोनीशिवाय कोहलीनेही (१०७) शतक ठोकले. धोनी, कोहलीच्या फलंदाजीने विजयासाठी मजबूत पाया रचला होता. रविवारच्या ८ बाद ५१५ धावावरून पुढे सोमवारी खेळ सुरु केला तेंव्हा धोनी २०६ तर भुवनेश्वरकुमार १६ धावा काढून खेळपट्टीवर कायम होते. त्यामध्ये ३१ धावची भर घातल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी (२२४) धावावर बाद झाला. त्या दोघांनी १४० धावची भागीदारी केली. दरम्यान; धोनीने २२४ धावा करताना कर्णधार असताना सचिनने केलेल्या २१७ धावाचा विक्रम मागे टाकला. त्यानंतर भुवनेश्वर कुमार व इशांत शर्मा या शेवटच्या जोडीने २६ धावांची भर घातली.

भारताने पहिल्‍या डावात सर्वबाद ५७२ धावा काढताना ऑस्‍ट्रेलियावर १९२ धावांची आघाडी घेतली आहे. भुवनेश्‍वर कुमार पीटर सिडलच्‍या गोलंदाजीवर तो बाद झाला. त्‍याने ३८ धावा काढल्‍या. इशांत शर्मासोबत त्‍याने अखेरच्‍या विकेटसाठी २६ धावा जोडल्‍या. ऑस्ट्रेलियाकडून वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिंसनने ५, तर ऑफस्पिनर नॅथन लॉयनने 3 गडी बाद केले. हेनरिक्सने व सिडलने प्रत्येकी एक गडी बाद केले.

दुस-या डावात सावध सुरुवात केल्‍यानंतर ऐन उपहारापूर्वी भारताने ऑस्‍ट्रेलियाला पहिला धक्‍का दिला आहे. शेन वॉटसन १७ धावांवर बाद झाला. आर. अश्व‍िनने त्‍याला बाद केले. टप्‍पा पडल्‍यानंतर चेंडू उसळला आणि वॉटसनच्‍या ग्‍लोव्‍हला लागून स्लिपमध्‍ये सेहवागच्‍या हाती गेला. तर ३२ धावा करणा-या कोवानला पायचीत केले तर हुजेसला शुन्यावर जडेजाने बाद केले. कर्णधार क्लार्क व वार्नर खेळत होते. कांगारूपुढचे संकट वाढविले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा ऑस्ट्रीलियाने दुस-या डावात तीन गडी बाद ६६ धावा केल्या होत्या.