गुगल या सर्च जायंट कंपनीने आपल्या क्रोम ऑपरेटटिंग सिस्टीमवर चालणारा आणि पहिलाच टच स्क्रीन असलेला लॅपटॉप सादर केला असून त्याची विक्री गुरूवारपासून सुरू झाली आहे. क्रोमबुक पिक्सल या नावाने गुगलने हा लॅपटॉप बाजारात आणला आहे आणि त्याची किमत आहे वायफायसह १२९९ डॉलर्स आणि क्षमता आहे ३२ जीबी. कंपनी एलटीई वायरलेस तंत्रज्ञान असलेले याच नावाचे दुसरे मॉडेल एप्रिलमध्ये बाजारात आणणार आहे आणि त्याची किमत असेल १४४९ डॉलर्स.
याविषयी अधिक माहिती देताना गुगल क्रोमचे एक्झिक्युटिव्ह सुंदर पिलाई म्हणाले की पूर्वीच्या क्रोम उपकरणांत टच स्क्रीन नव्हता. त्याची किमतही कमी होती. नवा लॅपटॉप गुगल प्ले ऑनलाईन स्टोअरमधून विक्रीसाठी उपलब्ध केला गेला आहे. आम्ही नव्यानेच घेतलेल्या मोटोरोला मोबिलिटी युनिटच्या सहाय्याने हार्डवेअर डिझायनिंग क्षेत्रातही प्रवेश करत आहोत. ही कंपनी स्मार्टफोन आणि टॅब्लेटचे हार्डवेअर डिझायनिंग करते.
पिलाई म्हणाले की टन स्क्रीनचा लॅपटॉप वापरण्यासाठी युजरला थोडा सराव व्हावा लागेल मात्र एकदा त्यावर हात बसला की हा वापर चांगल्या क्षमतेने करणे अधिक सोपे होणार आहे.