दमिश्क: सिरीयातील हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी चर्चा सुरू असतानाच दहशतवाद्यांनी घडविलेल्या स्फोटात ५३ जण मरण पावले तर २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

दमिश्क: सिरीयातील हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी चर्चा सुरू असतानाच दहशतवाद्यांनी घडविलेल्या स्फोटात ५३ जण मरण पावले तर २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
देशातील हिंसाचार थांबविण्यासाठी सत्ताधारी बाथ पक्ष आणि विरोधी पक्षांची कोहीरा येथे चर्चा सुरू असतानाच दहशतवाद्यांनी रशियन दूतावास आणि बाथ पक्षाचे मुख्यालय यांच्या बरोबर मध्ये शक्तिशाली स्फोट घडवून आणले. या स्फोटाच्या तीव्रतेने परिसरातील घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. संपूर्ण आसमंत धूळ आणि धुराने भरून गेला.
या स्फोटात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असून मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.