पुणे: कुस्ती प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले भारतीय नाव म्हणजे खली! या खलीनंतर आता मराठी मल्लाचे नाव झळकणार आहे. संदीप तिकोने या मराठी मल्लाची त्यासाठी तयारीही जोरात सुरु आहे. मात्र त्याची आर्थिक परिस्थिती त्याच्या मार्गातील अडथळा ठरली आहे.

ड्ब्ल्यू. ड्ब्ल्यू. एफ धोकादायक वाटत असला तरी हा प्रकार जगभरात तेव्हढाच लोकप्रियदेखील आहे. या लोकप्रिय कुस्ती प्रकारात यापुढे हा मराठमोळा मल्ल देखील पाहायला मिळणार आहे. ड्ब्ल्यू. ड्ब्ल्यू. एफ या कुस्तीच्या धोकादायक खेळात संदीप तिकोने मोठ्या धाडसाने उतरला आहे. त्याच्या धाडसाला आणि त्याचबरोबर मेहनतीला काही प्रमाणात यशही मिळाले आहे. यासाठी संदीप साऊथ आफ्रीकेची वारी करून आला आहे.
तसेच कलर्स वाहिनीवरील ’रिंग का किंग’ या शोमध्येही तो झळकला आहे. एवढंच नाही तर संदीपने ड्ब्ल्यू. ड्ब्ल्यू. एफमधील जगप्रसिद्ध आणि एकमेव भारतीय मल्ल खलीच्या भावालादेखील ट्रेनिंग दिले आहे.