चित्रांगदा सिंहचे वैवाहिक जीवन अडचणीत

अभिनेत्री चित्रांगदा सिंह मुंबईमध्ये आहे. तर तिचा गोल्फर पति ज्योति रंधावा गेल्या काही दिवसापासून नवी दिल्ली मध्ये राहत आहे. गेल्या काही दिवसापासून चि‍त्रांगदा बॉलीवुडमध्ये खुपच व्यस्त आहे. ती बीजी असलेल्या कारणाने पाच वर्षीय मुलाला व पतिला भेटत नसल्यची चर्चा आहे.

सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री चित्रांगदा सिंहचे वैवाहिक जीवन गेल्या काही दिवसापासून संकटात सापडले आहे. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यातील संबधात दुरावा निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसापासून चित्रांगदाला तिच्या मुलाला भेटू दिले जात नसल्याची चर्चा आहे. पुर्विप्रमाणे सध्या तिचा पति सुद्धा सिनेमाच्या कार्यक्रमात चित्रांगदा सोबत दिसत नाही.

याबाबत बोलताना चित्रांगदा सिंह म्हणाली, ‘ गेल्या काही दिवसापासून अफवा पसरविण्यात आली आहे. ती बॉलीवुडमध्ये काम करत आहे याबाबत पतिला काहीच आपत्ति नाही. तिचा पती एक प्रोफेशनल खेळाडू आहे. त्यामुळे प्रोफेशनल व्यक्तिला त्याची लाइफ स्टाइल चांगल्या पद्धीतीने माहित आहे. त्यामुळे तिला काम करीत असतना काहीच अडचण वाटत नाही.’