गेल्या काही दिवसपासून बॉलीवुडमध्ये अभिनेत्री रानी मुखर्जी आणि निर्माता आदित्य चोप्रा लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. तर कोण म्हणते की रानी आणि आदित्यने लग्न केले आहे. मात्र सोमवारी एका कार्यकमप्रसंगी एक मोठा खुलासा झाला त्यामुळे अजून रानी मुखर्जी आहे की चोप्रा याबाबतचे सस्पेन्स मात्र कायम राहिले आहे.
बॉलीवुडमधील बिहारी बाबू व अभिनेता शत्रुघन सिन्हा दिवंगत निर्माता यश चोप्रा यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाला आले होते. यावेळी यश चोप्रा यांचा संपूर्ण परिवार उपस्थित होता. त्यासोबतच बॉलीवुडमधील काही चर्चित चेहरे देखील उपस्थित होते. यावेळी शत्रुघन सिन्हाने दिवंगत फिल्मनिर्माता यश चोप्रा यांच्या परिवारातील ‘पामेला चोप्रा, उदय, रानी चोप्रा असे नाव घेतले. त्यावेळी त्यांनी आदि्त्य चोप्राचे नवा विअस्र्ले त्यावेळी त्याचा खुलासा करताना ते म्हणाले मी रानी चोप्राचे नाव घेतले आहे. त्यामुळे आता आदित्यहे नाव घेण्याची गरज नाही.
या कार्यक्रमात रानी मुखर्जीसह सर्वचजण शॉट गनचे मत ऐकून आवक झाले. रानी मुखर्जी मात्र हे ऐकून एकदम शांत झाली. याबबत तिने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. आदित्य चोप्रापण या मुद्देमुले शणात झाले. रानी मुखर्जी आणि आदित्य चोप्राचे संबध सर्वाना माहित आहेत. मात्र गेल्या काही दिवसात रानीने, आदित्यसोबत लग्न केले आहे की नाही याची चर्चा मात्र पुन्हा जोर धरु लागली आहे.