कैटरीना कैफ करणार स्टंट

येत्या काळात लवकरच हॉलिवुडचा अक्शन ‘नाइट एंड डे’ हा कॉमिडी सिनेमा येत आहे. गेल्या काही दिवसापासून या सिनेमाचे हिंदी वर्जन तयार करण्यात येत आहे. या ऑरिजनल इंग्लिश वर्जन सिनेमामध्ये टॉम क्रूज आणि कैमरन डियाज भूमिका करीत आहे. या सिनेमाच्या हिंदी वर्जनमध्ये अभिनेत्री कैटरीना कैफ आणि रितिक रोशन हे प्रमुख रोल करीत आहेत.

या हॉलिवुडच्या अक्शन सिनेमात कैमरनने खूपच अक्शन सीन्स केले आहेत. त्यामुळे तिच्या सारखे अक्शन सीन्स कैटरीना देखिल करायचे आहेत. त्यासाठी गेल्या काही दिवसापासून कैटरीना खुप मेहनत घेत आहे. त्यामुळे सध्या कैटरीना रितिक सोबत या सीनचा प्रैक्टिस करीत आहे. लवकरच या सिनेमाचे शूट सुरु होणार आहे.

हा सिनेमा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद हिंदीत तयार करीत आहेत. यापूर्वी कैटरीनाने जोया अख्तरच्या ‘जिंदगी न मिलेगी दोबारा’ या सिनेमात बाइकवर काही स्टंट केले आहेत. दरम्यान या सिनेमातील ऐक्शन व स्टंट सिन्ससाठी अमेरिकेवरून ट्रेनर बोलाविण्यात आला आहे. त्यानेच ‘धूम-३’ मध्ये ऐरोबैटिक्स आणि जिम्नैस्टिक स्टंटची ट्रेनिंग दिली होती.