भारतीय विमानसेवा क्षेत्रातून किंगफिशर बाहेर पडल्याचा फायदा अन्य भारतीय विमान कंपन्यांना झाला असल्याचे बोईंगचे आशिया पॅसिफिक आणि इंडिया विभागाचे उपाध्यक्ष दिेनेश केसकर यांचे म्हणणे आहे. या विषयी अधिक बोलताना ते म्हणाले की किंगफिशरची सेवा बंद झाल्याचा थेट फायदा जेट आणि स्पाईस जेट कंपन्यांना झाला आहे. त्यातच एतिहाडने जेट बरोबर भारतीय बाजारात येण्याची उत्सुकता दर्शविली आहे परिणामी विमान क्षेत्रात भारतीय बाजाराचे भवितव्य अधिक उज्ज्वल बनले आहे.
आक्टोबर २०१२ पासून किंगफिशरची उड्डाणे बंद आहेत. परिणामी अन्य विमान सेवा क्षेत्रातील कंपन्यांना व्यवसायाची चांगली संधी मिळाली आहे. विमान सेवेच्या भाडेदरात वाढ झाली आहे आणि या कंपन्यांचा फायदाही वाढला आहे. बोईंगलाही येत्या २० वर्षात भारतीय बाजारात व्यवसायात ८ टक्के वाढीची अपेक्षा असून या काळात किमान १४५० विमाने खरेदी केली जातील असेही ते म्हणाले. त्यातून किमान १७५ अब्ज डॉलर्सचा व्यवसाय होणार आहे.
बोईंगच्या एअरबस अे-३४० या विमानांना भविष्यात कमी स्कोप असेल असे संकेत मिळत असल्याचे सांगून केसकर म्हणाले की ७३७ आणि ७८७ या विमानांना आत्ताच चांगली मागणी येत आहे. जेटने अनुक्रमे ४६ आणि १० विमानांची मागणी नोंदविली असून स्पाईस जेटने ३१ ते ३६ बोईंग ७८७ ची मागणी नोंदविली आहे. ड्रीममलायनरच्या अडचणींवर लवकरच तोडगा निघेल असेही ते यावेळी म्हणाले.