‘सरप्राइज सेक्स’ प्रकरणी सनीला कमाल कोर्टात खेचणार

अभिनेत्री सनी लियोनने बलात्काराच्या बाबतीत विवादास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी भोजपुरी कलाकार कमाल खानने तिला कोर्टात खेचण्याचा निर्णय घेतला आहे. खानने ट्वीट केले आहे की त्याने जर विरोधात तक्रार नोंदवली तर सनी लियोन आणि तिचा पती या दोघाना २४ तासाच्या आत अटक होऊ शकते.

कमाल खानने सनीचा पती डेनियल वेबर यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. केआरकेने वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. त्याशिवाय त्याचे वकील सनी लियोनच्या विरुद्ध मुंबई आणि दिल्ली मध्ये केस फाइल करण्याची तयारी करीत आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वीच सनी लियोनने मुंबई पोलिसच्या सायबर सेलमध्ये विवादित ट्वीट करण्याच्या कारणावरून केआरकेच्या विरुद्ध सोमवारी सांयकाळी तक्रार नोंदवली होती.

सनी लियोनने रविवारी ट्वीट केले होते की, बलात्कार हा गुन्हा नसून ‘सरप्राइज सेक्स’ आहे. सनी लियोनची ही ट्वीट सगळीकडे दिसली होती. काही जणांनी ट्विटरवरील कमेंटला रीट्वीट केले आहे. त्यामुळे हा सर्व वाद उफळून आला आहे.

Leave a Comment