पोलिसासह चौघांकडून युवतीवर सामूहिक बलात्कार

नांदेड: मित्राला भेटण्यासाठी आलेल्या युवतीवर पोलीस शिपायासह आणखी तिघांनी अमानुष बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून दोघे फरारी आहेत. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र शासनाने अध्यादेश लागू केल्यानंतर नांदेडमध्ये बलात्काराचे ५ प्रकार घडले आहेत.

हिमायतनगर तालुक्यात राहणारी ८ व्या इयत्तेची विद्यार्थिनी आपल्या मित्राला भेटण्यासाठी भोकर येथे आली होती. मात्र मित्र न भेटल्याने ती गोंधळून गेली. त्याचा वेळी तिला भेटलेला पोलीस शिपाई सुनील संबाळकर याने तिला जबरदस्तीने रिक्षात घालून चंद्रमा रिसोर्ट येथे आणले. तिच्यावर बलात्कार करून त्याने संदीप हंमद आणि राजू खांडरे या दोघा मित्रांना बोलावून घेतले. त्यांनीही तिच्यावर बलात्कार केला.

रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तिला एका गाडीतून हंमद याच्या घरी आणून रात्रभर या सर्वांनी तिच्यावर अत्याचार केले. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास या नराधमांनी तिला भोकर परिसरात आणून सोडले.

या मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हंमद, खांडरे, रिसोर्टचा मालक अशोक मारकवार आणि आणखी एकाला ताब्यात घेतले. संबाळ्कर आणि बाळू लामगे याचा शोध पोलीस घेत आहेत.

Leave a Comment