
नवी दिल्ली – गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत पंतप्रधान मनमोहनसिंग यांची भेट घेतली. केंद्र सरकारने गुजरातला दिल्ली मुंबईच्या दरात गॅस पुरवण्यास नकार दिल्याबद्दल त्यांनी या भेटीत त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येते.

नवी दिल्ली – गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत पंतप्रधान मनमोहनसिंग यांची भेट घेतली. केंद्र सरकारने गुजरातला दिल्ली मुंबईच्या दरात गॅस पुरवण्यास नकार दिल्याबद्दल त्यांनी या भेटीत त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की आमची भेट आणि चर्चा चांगली झाली. विविध विषयावर आम्ही चर्चा केली. गुजरातच्या विकासासाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्याचे मोदी म्हणाले. लोककल्याणकारी योजनांसाठी केंद्र सरकारतर्फे जे प्रयत्न केला जातील त्याला पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासनही मोदी यानी गुजरातच्यावतीने दिले. या दोघांमध्ये पतंप्रधानांच्या निवासस्थानी झालेली चर्चा सुमारे तासभर चालली.
गुजरातला ज्या दराने गॅस पुरवला जातो तो विषय यावेळी प्रामुख्याने चर्चीला गेला. ते म्हणाले की; केंद्र सरकारतर्फे मुंबई आणि दिल्लीला स्वस्तात गॅस पुरवला जातो. गुजरातलाही त्याच दराने गॅस पुरवावा अशी आमची मागणी आहे. ती मागणी केंद्राने अमान्य केल्याने आम्ही कोर्टात गेलो होतो. तेथेही आमच्या बाजूने निकाल लागला आहे. परंतु तरीही गेले सहा महिने त्यांनी न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही म्हणून आम्ही केंद्र सरकारच्या विरोधात पुन्हा कोर्टात गेलो आहोत; असे ते म्हणाले. उच्च न्यायालयच्या निर्णयाची अंमलबजावणी न करता हा विषय सर्वोच्च न्यायालयात नेऊन त्यात विलंब करण्याचा डाव केंद्र सरकारकडून केला जात आहे; असा आरोप मोदी यांनी केला.
नर्मदा सरोवर प्रकल्पात नवे गेट बांधणे, या प्रकल्पाचे पाणी राज्यभर सर्वत्र पोहचवण्यासाठी कालव्यांचे जाळे उभारणे अशा प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने सहकार्य दिले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी पतंप्रधानांकडे व्यक्त केली. त्यात पूर्ण सहकार्य करून हे प्रकल्प वेगाने मार्गी लागतील यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही पतंप्रधानांनी यावेळी मोदींना दिली.