ड्रोन हल्ले कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या योग्यच: अमेरिका

वॉशिंग्टन: दहशतवादाच्या विरोधातील लढाईत ड्रोन सारखे हल्ले पूर्ण कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या योग्य असेच आहेत असे समर्थन अमेरिकेने केले आहे.

अलकायदाच्या दहशतवाद्यांच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच येथील अड्ड्यांवर हल्ले करण्यासाठी ड्रोन मानवरहित विमानातून क्षेपणास्त्र हल्ले केले जातात. या हल्ल्यांमुळे काही वेळा निरपराध लोकांनांही आपले प्राण गमवावे लागत असल्याने अमेरिकेने हे हल्ले थांबवावेत अशी मागणी पाकिस्तानने केली आहे. ती मागणीही अमान्य करीत अमेरिकेने या हल्ल्यांचे जोरदार समर्थन केले आहे.

अमेरिकेवर होणारा संभाव्य हल्ला रोखण्यासाठी आणि अमेरिकन नागरीकांच्या जीवाला असलेला धोका टाळण्यासाठी अलकायदाच्या ठिकाणांवर असे हल्ले करणे आम्हाला भाग आहे; असे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने सांगितले.

आवश्यकता लक्षात घेऊनच असे हल्ले केले जातात. तथापि त्याचा वापर काळजीपूर्वक केला जातो. निरपराध नागरिकांना याची झळ बसु नये याची काळजीही घेतली जात असल्याचे या प्रवक्त्याने सांगितले.

Leave a Comment