
मुंबई – खोट्या टीआरपीचे (TRP) रॅकेट मुंबई पोलिसांनी उघड केले असून पैसे देऊन यात टीआरपी मिटरशी छेडछाड करण्यात येत असल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली. दोन मराठी चॅनेलच्या मालकांना याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले असून खोट्या टीआरपीसाठी रिपब्लिक चॅनेलचे नाव पुढे आले आहे. काही चॅनेल बंद असताना सुरु ठेवण्यात आली.
मुंबई पोलिसांनी उघड केले खोट्या टीआरपीचे रॅकेट, तीन चॅनेलची नावे आली समोर
२००० बॅरोमीटर देशात लावण्यात आले आहे. हंसा कंपनीला बॅरोमीटर लावण्याचे आणि दुरुस्तीचे काम देण्यात आले होते. हंसा कंपनीचे माजी कर्मचारी बॅरोमीटर असणाऱ्या घरांची माहिती पुरवत असे हेच कर्मचारी लोकांना पैसे देऊन काही खास चॅनल लावायला सांगत होते, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.
दोन व्यक्तींना आतापर्यंत या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. २० लाख रुपये त्याच्या खात्यातून मिळाले आहेत, तसेच ८ लाख रुपये जप्त केले आहेत. फक्त मराठी, बॉक्स सिनेमा या चॅनलच्या मालकांना ताब्यात घेण्यात आले असून बीएआरसीने दिलेल्या रिपोर्टनुसार रिपब्लिक टीव्हीचे प्रमोटर, कर्मचारी यासगळ्यात अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
