स्पायडर मॅनमुळे सुरक्षा संस्थांना डोकेदुखी

नवी दिल्ली दि.५ – स्पायडरमॅन, चिनकिग या दोन  सॉफ्टवेअरमुळे सेल्युलर टेक्नॉलॉजी सुरक्षा संस्थांना डोकेदुखी निर्माण झाली असून त्याविरोधात कोणताच कडक कायदा अस्तित्वात नसल्याने हा त्रास अधिक वाढला असल्याचे समजते.

या क्षेत्रातील तज्ञांची दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक मोबाईलला इंटरनॅशनल मोबाईल स्टेशन इक्विपमेंट आयडेंटीटी नंबर हा पंधरा आकडी नंबर असतो. कोणत्याही मोबाईलचा वापर दहशतवाद, धमक्या देणे अथवा गुन्हेगारीसाठी केला जात असेल तर या विशिष्ठ नंबरवरून सुरक्षा संस्था संबंधित मोबाईल वापरणार्यााचा शोध घेऊ शकतात. मात्र स्पायडरमॅन आणि चिनकिग या नावाने आलेल्या दोन सॉफटवेअरमुळे हा नंबर बदलणे शक्य होत आहे. विशेषतः चीनी बाजारातून येणार्याम मोबाईलसाठी या सॉफटवेअरचा वापर केला जात आहे. मध्यप्रदेशात अशी एक घटना नुकतीच घडली आहे.

मध्यप्रदेश पोलिसांनी या संदर्भात दाखल केलेल्या तक्रारींमुळे सुरक्षा संस्था अधिक सावध बनल्या आहेत आणि त्यांनी याबाबत काय उपाययोजना करता येतील याची चर्चा टेलिकॉम विभागाशी सुरू केली आहे. सरकारने असा विशिष्ट नंबर अपुरा असेल तर त्या मोबाईलची नोंदणी टेलिफोन ऑपरेटरनी करू नये अशा सूचना जारी केल्या आहेत तसेच कॉमर्स  आणि इंडस्ट्रीज मंत्रालयाने असल्या अपुर्याल नंबरच्या मोबाईल आयातीवरच बंदी घातली आहे. केंद्रीय मंत्रालयाने असली सॉफटवेअर ब्लॉक करण्याच्या सूचना टेलिकॉम विभागाला दिल्या आहेत मात्र असे ब्लॉकिग करणे अशक्य असल्याचे तज्ञांचे मत आहे. कारण सध्या स्पायडरमॅन आणि चिनकिग या नावाने असलेली ही सॉफटवेअर ब्लॉक केली तर अन्य कोणत्याही नावाने ती पुन्हा वापरात येतील असे त्यांचे म्हणणे आहे.