बॉलीवुडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित पुन्हा एकदा पडद्यावर झळकण्याची तयारी करीत आहे. गेल्या काही दिवसापासून निर्माता अनुराग बसूच्या ‘गुलाब गैंग’ या सिनेमाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे.

बॉलीवुडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित पुन्हा एकदा पडद्यावर झळकण्याची तयारी करीत आहे. गेल्या काही दिवसापासून निर्माता अनुराग बसूच्या ‘गुलाब गैंग’ या सिनेमाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे.
या महिन्यापासून आता ती विशाल भारद्वाजच्या ‘डेढ़ इश्किया’ या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या सिनेमात ती लीड रोल करीत आहे. हा सुपरहिट सिनेमा ‘इश्किया’ चा सीक्वल आहे. त्यामुळे या सिनेमाकडून माधुरीला खूप अपेक्षा आहेत.
या सिनेमात तिच्या सोबत अरशद आणि नसीरुद्दीन शाह झळकणार आहेत. तिच्या सोबत अभिनेत्री माही गिल पण काम करणार आहे. या सिनेमाबाबत बोलताना माधुरी म्हणाली की, ‘नासिरसारख्या कलाकारासोबत काम करणे हे माझ्या दृष्टीने एक आव्हानात्मक आहे. तो भारतीय सिनेमामधील महान कलाकार आहे.’
‘डेढ इश्कीया’मधून अभिनेत्री माधुरी जोरदार पुनरागमन करेल अशी सर्वांची अपेक्षा आहे. ती एक नावजलेली अभिनेत्री आहे. आगामी काळात ती कशाप्रकारे अभिनय करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. ‘इश्किया’ या सिनेमाप्रमाणे आगामी काळात येत असलेला ‘डेढ़ इश्किया’ हा सिनेमा खूपच बोल्ड असणार आहे. या सिनेमातून माधुरीच्या अभिनयाचा कस लागणार आहे.