सीटी स्कॅनचा असाही वापर

व्हर्जिनियातील एका वस्तूसंग्रहालयाने सीटी स्कॅनचा वापर चार हजार वर्षांपूर्वीच्या ममीचे रहस्य जाणून घेण्यासाठी केला असून या ममीचा चेहरा कसा होता याचाही उलगडा त्यामुळे होऊ शकणार आहे असे समजते. तसेच सीटी स्कॅनच्या मदतीने या ममीच्या शरीरात कोणते स्नायू अजून अस्तित्वात आहेत तसेच ममीफिकेशन करण्यापूर्वी शरीरातील अवयव काढून टाकले होते का, मृत व्यक्तीचे अंदाजे वय, त्याचा आहार काय होता तसेच त्याचा मरणाचे कारण काय असावे हेही समजू शकणार आहे. सीटी स्कॅनच्या सहाय्याने ममीचे थ्री डी मॉडेल तयार करण्यात आले असल्याचेही समजते.

या संग्रहालयाकडे ही ममी १९५३ साली आली. चेबी नावाच्या राजाची ही ममी असून त्याविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. खडकातून कोरलेल्या एका गुहेत ही ममी ठेवण्यात आली होती. शेख फरग याने १९२३साली या ममीचे उत्खनन केले होते व त्यावेळच्या अंदाजानुसार २१५० ते २०३० बीसी या काळातली ही ममी आहे. चीबे मेला तेव्हा २५ ते ४० वयोगटातील असावा असा अंदाज तज्ञांची वर्तविला होता आणि त्या काळात इजिप्तमध्ये अशांतता होती असेही तज्ञांचे म्हणणे आहे.

त्यावेळी ममीमधील चेबीचा चेहरा जसा रेखाटला गेला आहे तसाच तो प्रत्यक्षात होता काय याचा शोध आता सीटीस्कॅनमुळे घेणे शक्य हेाणार असून त्यामुळे चार हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासावर प्रकाश पडणार आहे असे संशोधकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment