शिल्पाने केले गंगा स्नान

मकरसंक्रतीच्या मुहूर्तावर अनेक हिंदू भाविकासह साधू मंडळींनी गंगा नदीत पवित्र, शाही स्नान करण्याची पर्वणी साधली आहे. १२ वर्षानंतर एकदा होणा-या या महाकुंभासाठी गंगा किनारी अनेक भविकाची मोठी गर्दी उसळली आहे. या महाकुंभासाठी गंगा नदीच्या तीरावर इंडस्ट्रीजमधील अनेक स्टार मंडळी सुद्धा प्रयाग येथे शाही स्नान करण्यासाठी आले आहेत. बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी सुद्धा इलाहाबाद शहरात पूजेसाठी आली आहे.

१२ वर्षानंतर एकदा होणा-या या महाकुंभासाठी गंगा नदीच्या तीरावर लाखो नागरिकाचा देशभरातून जनसागर उसळला आहे. यावेळी बॉलीवूडची स्टार अभिनेत्री शिल्पाने देखील या ठिकाणी शाही स्नान केले. त्याशिवाय यावेळी तिने गंगा मातेची पूजा केली. पूजा झाल्यानंतर तिने संगम परिसरात शाही स्नान केले. त्याशिवाय याठिकाणी गेल्या काही दिवसपासून राबविण्यात येत असलेल्या गंगा नदी प्रदूषण मुक्त अभियानामध्ये सहभागी होण्याचा संकल्प सुद्धा तिने केला आहे.

यावेळी अभिनेत्री शिल्पा परमार्थ निकेतन आश्रम, संत स्वामी चिदानंद आश्रमला भेट देऊन त्याठिकाणी दर्शन केले. त्याशिवाय शिलापाच्या हस्ते यज्ञ आणि हवन करण्यात आले. शिल्पा याठिकाणी उद्योगपति श्रीचंद हिंदूजा सोबत आली होती. शिल्पा सोबत याठिकाणी दर्शनासाठी तिचे आई- वडिल देखील आले होते.