चीनमध्ये गणेशाच्या टॅटूला वाढती मागणी

सर्वांगावर गोंदवून घेणे किवा टॅटू काढणे याला दशकभरापूर्वी चीनमध्ये बंदी होती. मात्र आता ही बंदी उठविली गेली असून गेल्या महिन्यातच ही बंदी मागे घेण्यात आली आहे. चीनमध्ये टॅटू काढून घेण्याची फॅशन फारच लोकप्रिय झाली असून आता हिंदू धर्मातील मुख्य दैवत असलेल्या गणेशाच्या टॅटूंना मोठी मागणी असल्याचे समजते.

टॅटूचे वेड चिन्यांना पूर्वीपासूनच आहे. मात्र त्यात ड्रगन, साप, वाघाचा चेहरा, प्रियकर अथवा प्रेयसीची छबी, दैवी प्रतिमांना अधिक पसंती दिली जात असे. अलिकडे मात्र गणपतीच्या प्रतिमेला प्रचंड पसंती दिली जात असल्याचे चायना असोसिएशन ऑफ टॅटू आर्टिस्टचे महासंचालक फू हैलिन यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले की चीनमध्ये अशी ३ लाख टॅटू शॉप असून त्यातील २ हजार एकट्या बिजिंगमध्ये आहेत. मात्र या शॉपमधून काम करणार्याू कामगारांतील ९० टक्के क्वालिफाईड नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले.

चीन मानवी संसाधन विभाग, सामाजिक सुरक्षा विभाग आणि चायना हेअर ड्रेसिंग ब्युटी असोसिएशनने गेल्या महिन्यात टॅटू काढण्यासाठीही परवानगी जाहीर केली असली तरी टॅटू शॉप चालविणार्यांयना परवाना परिक्षा बंधनकारक केली आहे. या कामात स्वच्छता कसोशीने पाळावी लागते तसेच वापरण्यात येणार्या् सुयांचे निर्जंतुकीकरणही करावे लागते अन्यथा त्वचेचे रोग व अन्य रोग होण्याचीही भीती असते.

चीनी युवकांची गणेशाची प्रतिमा गोंदवून घेण्यासाठी मिळत असलेली पसंती ही चिनी युवकांत मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेले हिंदू धर्माचे आकर्षण याचीच परिणिती असल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment