सनी करणार वेगळ्या भूमिका

गेल्या काही दिवसापासून बॉलीवूड मधील सेक्सी अभिनेत्री म्हणून सनी लीयोनची ओळख झाली आहे. हे ओळख बदलाण्यासाठी सध्या ती प्रयत्न करीत आहे. त्यामुळे यापुढील काळात ती वेगळ्या धाटणीच्या भूमिका ती करणार आहे. येत्या काळात सनीने ‘टीना एंड लोलो’ हा सिनेमा साइन केला आहे. हा एक एक्शन सिनेमा आहे. सनीने अजून तरी या सिनेमाबाबत काही ठरविले नाही. मात्र या सिनेमासाठी एकट्या सनीला साइन केले असल्याचे समजते. इतर कलाकाराची निवड अजून सूरु आहे.

येत्या काही दिवसातच तिच्या ‘रागिनी एमएमएस-२’ ची शूटिंग सुरु होत आहे. या सिनेमातील तिचा रोल समजून यावा यासाठी तिने काही दिवसापुर्वीच या सिनेमाचे एक वर्कशॉप त्यांनी पूर्ण केले आहे. त्याशिवाय या सिनामाची शूट सुरु होण्यापूर्वी तिने मुंबई येथील प्रसिद्ध आष्टविनायक मंदिरात दिग्दर्शक एकता कपूर सोबत जाऊन गणपतीचे दर्शन घेतले आहे. सनी लियोनचे सेक्स अपील बघून गेल्या काही दिवसात तिला ब-याच निर्मात्यांनी साइन केले आहे. अंतर तिला वेगळ्या स्वरुपचे काम मिळत नव्हते.

येत्या काळात मात्र तिने आता वेगळ्या धाटणीच्या भूमिका करण्याचे तिने ठरविले आहे. त्यासाठी ती बॉलीवूडमधील वेगवेगळ्या दिग्दर्शकाची भेट घेत आहे. गेल्याकाही दिवसांपासून तिची झालेली सेक्सी इमेज तिला बदलायची आहे. सध्या सनी तिच्या कामावर खूपच खुश आहे. पण ती तिच्या पैरेंट्सना मिस करीत आहे. आगामी काळात तिने वेगवेगळे रोल करण्याचे ठरविले असल्याने तिचे प्रशंसक मंडळी सुद्धा खुश आहे.

Leave a Comment