खिलाड़ी कुमारच्या नावाने चर्चेत असलेला अक्षय कुमार ‘जोकर’ या सिनेमातील त्याचा रोल मनोरंजनचा विषय ठरला होता. मात्र गेल्या काही दिवसापासून या भूमिकेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न अक्षयकुमार करीत आहे. सध्या अक्षय हा ‘खिलाड़ी -७८६’ या सिनेमातून बॉलीवुडमध्ये पुन्हा एकदा एक्शन किंग म्हणून झळकला आहे. आगामी काळात आणखीन एक त्याचा नवीन सिनेमा येत आहे.
गेल्या काही दिवसापासून अक्षय कुमार खिलाड़ीच्या यशानंतर नवीन सिनेमाच्या तयारीला लागला आहे. या स्पेशल असलेल्या सिनेमात अक्षय कुमार काजल अग्रवाल सोबत लिपलॉक करताना दिसणार आहे. हा सिनेमा त्याच्या दृष्टीने महत्वाचा राहणार आहे. या सिनेमात अक्षयची भूमिका साध्या ऑफिसरची असणार आहे. हा ऑफिसर चोरांना पकडण्याचे काम कारणार आहे. चोरांनी एक ज्वैलरी शोरूम मध्ये देखील चोरी केली आहे. त्यांना पकडण्याचे काम अक्षय या सिनेमात करणार आहे. खिलाड़ी ७८६ या सिनेमातून त्याने तोच बॉलीवुडचा एक्शन किंग असल्याचे दाखवून दिले आहे.
या सिनेमात साधा आणि सरळ असलेला अक्षय कुमार काजल अग्रवाल सोबत पाहिल्यदाच काही इंटीमेट सीन करताना दिसणार आहे. त्यामुळे या सिनेमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.