गेल्या काही दिवसापासून अभिनेत्री ऐश्वर्या रॉय-बच्चन बॉलीवुडपासून दूर राहिली असली तिला अजूनही अवार्ड मिळत आहेत. गेल्या काही दिवसापासून तिने मुलीला जन्म दिल्यानंतर ती बॉलीवुडपासून काहीसी दूर गेली आहे. असे असले तरी नेहमीच तिला कोणता ना कोणता अवार्ड मिळतच आहे. ऐशला सर्वात मोठी अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे.
या अवार्ड साठी ऐश सोबत बॉलीवुड मधील अन्य मोठ्या अभिनेत्री असलेली सोनाक्षी सिन्हा, विद्या बालन आणि जरीन खान यांची नावे सुद्धा रेसमध्ये होती. या श्रेणीसाठी वोटिंग घेण्यात आले होते. ऐशला सर्वात जास्त वोट मिळाले. त्यामुळे तिला हा अवार्ड प्रधान करण्यात आला आहे. या अवार्डसाठी करण्यात आलेल्या वोटिंग मधील ३० टक्के मत ऐश्वर्या रॉयला मिळाले होते. तर वोटिंगमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला २४ टक्के मत मिळाले होते. तर त्याच्या तुलनेत अभिनेत्री जरीन खान हिला २१ टक्के मत मिळाले तर अभिनेत्री विद्या बालनला १९ टक्के मते मिळाले.
तसे पहिले तर हा अवार्ड जरी ऐशला मिळाला असला तरी तिच्या चाहत्यासाठी मात्र यामुळे आनंद होणार की नाही हे सांगणे मात्र मुश्कील झाले आहे.