![](https://www.majhapaper.com/wp-content/uploads/12_19.jpg)
अभिनेत्री करिश्मा कपूरनंतर बॉलीवुड मधील अजून एक सुंदर जोडी घटस्फोट घेण्याचा विचार करीत आहे. गेल्या काही दिवसापासून अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा आणि डिफेंरट हीरो ऱणबीर शौरी यांच्यातील मतभेद वाढतच असल्याने दोन वर्षपूर्वी झालेले त्यांचे लग्न आता तुटण्याच्या मार्गावर आहे. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यातील संबध बिघडले आहेत. मात्र हा वाद सध्या मुलाच्या कस्टडीवरून अडकला आहे. त्यांचा मुलगा अजून खूपच लहान आहे.
तसे पहिले तर सप्टेबर २०१२ मध्येच बातमी आली होती की, कोंकणा आणि रणबीर यांच्यातील संबध बिघडले आहेत. कोंकणाच्या मते मुलगा लहान असल्यामुळे ती जमवून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र संबध सुधारत नसल्याने तिने घटस्फोट घेण्याचा विचार केला आहे. २०१० पासून लिव इन रिलेशनशिप मध्ये राहत असलेले कोंकणा आणि रणबीरने अचानक लग्न केले होते. त्यांनी अचानक लग्न केल्याने सर्वानाच आश्चर्य वाटले होते.
लग्नाची माहित त्यावेळी कोंकणाने ट्विटर वरून दिली होती. लग्नाची चर्चा सुरु असतानाच अचानक बातमी आली की, कोंकणा एका मुलाची आई झाली आहे. त्यामुळे रणबीर-कोंकणा लवकर लग्न करण्याचे कारण सर्वांनाच समजले. काही दिवस दोघेपण खुश होते मात्र आता अचानक बातमी आली आहे की, दोघेपण घटस्फोट घेत आहेत. या सर्व प्रकरामुळे कोणालाच काही समजत नाही.