हा वीक एंड तसा पहिला तर यावेळेस बॉलीवूड मधील स्टार साठी खूपच बिजी राहिला. दोन-तीन पार्टी आयोजित करण्यात आल्याने यावेळेस सर्वांचीच धावपळ झाली. एकीकडे विद्या बालन आणि सिद्धार्थ कपूर यांची रिसेप्शन पार्टी आणि दुसरीकडे शाद अलीचे लग्न आणि पोलिस मेळावा असे एकाच दिवशी दोन इवेंट आले होते. मात्र या पार्टीचे एक वेगळेपण होते एकाला बघून दूसरा स्टार पार्टीतून गायब होत होता. तसे पहिले तर त्याची सुरुवात रेखा आणि जया बच्चन पासून सुरु झाली.
या पार्टीत जया बच्चनला बघितल्यानंतर रेखा गायब झाली. हा प्रकार त्यानंतरही सुरूच राहिला प्रियंका चोप्राने पण पार्टीतून काढता पाय घेतला. विद्या बालन आणि सिद्घार्थच्या रिसेप्शनमध्ये शाहरुख-गौरी, रितिक-सुजैन सोबत आले, तेंव्हा प्रियंका चोप्रा त्या ठिकाणाहून गायब झाली. तसे पहिले तर प्रियंका १५ मिनट पूर्वीच पार्टीत आली होती. त्यानंतर दुस-याच दिवशी अंबानीच्या एंटीलिया येथील पार्टीत प्रियंका धूम माजवीत होती. मात्र त्याठीकानाहून ही ती शाहरुख-गौरीला बघून गायब झाली.
हाच प्रकार पुन्हा अर्जुन रामपालने पुढे नेला. गेल्या काही दिवसापासून अर्जुन, शाहरुख पासून लांबच राहात आहे. तसे पहिले तर गौरी आणि अर्जुन चांगले दोस्त आहेत. मात्र त्याचे काय बिनसले आहे हे माहित नाही. पण तो पण या पार्टीतून गायब झाला. सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार विद्या-सिडच्या पार्टीत दोघांनी पण एक दूस-याकडे फक्त बघितलेच होते.