नरगिसने दिला लग्नाला नकार

गेल्या काही दिवसपासून बॉलीवूडमध्ये अफवा पसरल्या आहेत. मॉडल आणि ऐक्ट्रेस असलेल्या नरगिस फाखरी ऐक्टर आणि सिनेनिर्माता उदय चोप्रा सोबत येत्या मार्च महिन्यात लग्न करणार असल्याच्या अफवा काही दिवसापासून पसरल्या आहेत. या सर्व अफवा असून मी लग्न केले नाही असे सांगून नर्गिसने ही बातमी म्हणजे कोणी तरी पसरवलेली अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.

इम्तियाज अली यांचा २०११ साली रिलीज झालेल्या ‘रॉकस्टार’ या सिनेमातून बॉलिवुड मध्ये नरगिसने एन्ट्री केली आहे. ‘रॉकस्टार’ या सिनेमात रणवीर कपूरने लीड ऐक्टर तर नरगिस त्याची को-स्टार आहे. नुकताच तिने ट्विटरवरून लग्नाच्या बाबतचा खुलासा केला आहे. नरगिसने पोस्ट केले आहे की, मी अजून तरी अनमैरिड आहे. आणि ती सध्या त्यातच खुश आहे. गेल्या काही दिवसापासून ती सिनेमाच्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे लग्नाचा काही विचार केलेला नाही. मी मार्च महिन्यात लग्न करणार आहे अशा कोणी तरी अफवा पसरविल्या आहेत. त्यामध्ये काहीच सत्य नाही.

सध्या मी कामावर लक्ष केंद्रित केले असून भविष्यात तरी तिचा लग्न करण्याचा विचार नाही. याबाबत काही जणांनी केवळ अफवा पसरविल्या असून गेल्या दोन दिवसापासून मी सुद्धा लग्नाच्या या अफवेमुळे परेशान झाले आहे.