‘बिग बॉस’ च्या घरी राहू शकत नाही-इमरान

काही दिवसापूर्वी ‘बिग बॉस’ मध्ये ‘मटरु की बिजली का मंडोला’ या सिनेमाचा प्रचार करण्यासाठी एक्टर इमरान खान गेला होता. यावेळी ‘बिग बॉस’ च्या घरात तू राहू शकशील काय असा सवाल इमरान खानला केला असता तो म्हणाला, ‘बिग बॉस’चे घर खूपच लहान आहे. त्यामुळे मी याठिकाणी राहू शकत नाही. यामध्ये सहभागी झालेले कंटेस्टेंट जे करू शकतात ते मी करू शकत नाही.

‘बिग बॉस’ च्या सेटवर सहभागी झाल्यानंतर इमरान खान म्हणाला, ‘ बाहेरून ज्यावेळी आपण घर बघतो त्यावेळी घर खूप मोठे वाटते. मात्र घरामध्ये गेल्यानंतर खूपच वेगळे असे वाटते. आपण विचार करतो त्यापेक्षा खूपच घर लहान आहे. टीवीवरच फक्त हे घर मोठे वाटते. एवढ्या छोट्या जागेत तीन महिने राहणे म्हणजे सजा असल्यासारखे वाटते. त्याशिवाय एकमेकाशी असलेले प्रॉब्लम आहेत. जेवणसुद्धा हवे तेवढे मिळत नाही. तर ऐक्ट्रेस अनुष्का शर्मा म्हणली, ‘ लहान घर असल्यामुळे राहण्यास अडचण होते. तिला नॉन वेज जेवण आवडते. मात्र या घरात केवळ आठ दिवसातून एकदा नॉन वेज जेवण मिळते. त्यामुळे मी याठिकाणी राहू शकत नाही.’

इमरान व अनुष्का फक्त अर्धा तास आत गेले होते. त्यामुळे त्याना कधी बाहेर येईल असे वाटत होते. तसे पहिले तर अनुष्काला ‘बिग बॉस’ च्या घरातील ब-याच गोष्टी माहित होतात. कारण तिचे वडील दररोज हा कार्यक्रम पाहतात. विशाल भारद्वाज दिग्दशित ‘मटरु की बिजली का मंडोला’ या सिनेमात इमरान आणि अनुष्काशिवाय पंकज कपूर आणि शबाना आजमी काम करीत आहेत. हा सिनेमा ११ जानेवारी रिलीज होत आहे.

Leave a Comment