जेनेलियामुळे बदलला रितेश

राजकीय घरान्याशी संबधित असलेला अभिनेता रितेश देशमुख आता निर्माता झाला आहे. या सर्व गोष्टीचे क्रेडिट रितेश पत्नी जेनेलियाला देतो. ३ जानेवरीला रितेशला सिनेसृष्टीत येउन १० वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यावेळी रितेश आणि जेनेलियाने ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमातून कारकिर्दीला सुरुवात केली होती. आता ते दोघेपण पति-पत्नी झाले आहेत. सध्या निर्माता म्हणून रितेशने दुसरी इनिंग सुरु केली आहे. त्याच्या पहिल्या मराठीतील सिनेमाचे नाव ‘बालक पालक’ असे आहे.

याबाबत बोलताना रितेश म्हणाला, ‘ लोकानी मला पसंद केले त्यामुळे मी सर्वांचा ऋणी आहे. नागरिकानी दिलेल्या प्रेम आणी धैर्य यामुळे मी यशस्वी झालो आहे. त्यामुळेच मी आता जेनेलियाच्या सांगण्यानुसार निर्माती क्षेत्रात उतरलो आहे. माझा पहिला ‘बालक पालक’ हा सिनेमा येत आहे. हा सिनेमा सर्वना आवडेल असाच असून यासाठी आमच्या टीमने खूपच मेहनत घेतली आहे.’

गेल्यावर्षी फेबुवारी महिन्यात रितेश आणि जेनेलियाने नऊ वर्षाच्या प्रेमप्रकरनानंतर लग्न केले होते. या लग्नानंतर काही दिवसातच रितेशचे वडील विलासराव देशमुख यांचे किडनी खराब झाल्याने मृत्यू झाला होता. रितेशच्या मते तो जेनिलिया शिवाय तो अपूर्ण आहे. जेनेलियामुळे त्त्याच्या लाइफमध्ये खूप बदला झाला आहे. जेनेलिया ही सध्या रितेशच्या आयुष्यचा एक हिस्सा बनली आहे.

Leave a Comment