‘मैने प्यार किया’ पासून ते ‘दबंग-२’ असे हिट सिनेमा देणा-या सलमानचा आज ४७ वा वाढदिवस आहे. वाढदिवसा निमित्त सलमान खानला शूभेच्छा देण्यासाठी बॉलीवुड मधील स्टार मंडळीची त्याच्या घरी बुधवारी रात्रीपासून रीघ लागली आहे. सलमान खानचा वाढदिवस फक्त बॉलीवुड अथवा त्यच्या फैन्ससाठी खास नाही तर त्याच्या एनजीओ बींग ह्यमन साठी सुद्ध महत्वाचा आहे. दुसरीकडे त्याला हिट एंड रन केस केसची सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने थोडासा त्याला दिलासा मिळाला आहे.
सलमान खानच्या ४७ व्या वाढदिवशी तो लग्न कधी करणार याचीच जोरात चर्चा रंगली आहे. आणि जर तो लाग्न्कारणार असेल तर कोणासोबत करणार हाच प्रश्न सर्वाना पडला आहे. मीडियाने त्याला काही नाव सुचवले आहेत. यामध्ये सध्या कैटरीना कैफ आणि सोनाक्षी सिन्हा यांचे नाव टॉपवर आहे. सध्या सलमान लग्न करण्याचा विचार करीत नाही. तर सध्या तो फक्त कोर्टचा केस आणि दबंग सिनेमाची कमाई या दोनच गोष्टीचा विचार करीत असतो. आज कोर्टाची तारीख होती त्यामुळे त्याला राजस्थानला जावे लागणार होते. मात्र वकिलाने ही तारीख वाढवून घेतली आहे.
‘दबंग-२’ या सिनेमची पहिल्या पाच दिवसाची कमाई ९२ कोटीच्या वर गेली आहे. त्याच्या वाढदिनी म्हणजेच गुरुवारी हा सिनेमा १०० कोटीची कमाई करेल असे वाटते. ट्विटरवर सुद्ध त्याला टैग करून काही जणांनी शूभेच्छा दिल्या आहेत. फेसबुक वरून पण त्याला शूभेच्छा दिल्या जात आहेत.