ईशांत-कामरानला ठोठावला दंड

दोन दिवसापुर्वी बेंगलोर येथे भारत -पाक दरम्यानच्य टी-२० सामण्यात ईशांत शर्मा आणि पाकच्या कामरान अकमलमध्ये वाद झाला होता. त्यासाठी पंचाना आणि टीम इंडियाच्या खेळाडूंनी मध्यस्थी करावी लागली होती. याप्रकरणी आय़सीसीने कारवाई केली असून दोन्ही खेळाडूंना दंड ठोठावला आहे. ईशांत शर्माच्या मॅच फीमधून १५ टक्के तर कामरान अकमलच्या मॅच फीमधून ५ टक्के रक्कम वजा करण्यात आली आहे.

भारत -पाक दरम्यानचा सामना म्हटले की हे वाद होतच असतात. हा प्रकार दोन्ही संघासाठी तसा काही नवीन नाही आहे. मात्र मधल्या काळात दोन्ही संघा दरम्यानचा तणाव काहीसा निवळला होता. ब-याच दिवसाच्या विश्रांतीनंतर मंगळवारी झालेल्या पहिल्या ट्वेण्टी सामन्यात फलंदाजी करताना कामरान अकमल आणि ईशांतमध्ये जोरदार वाद झाला होता. ईशांत शर्माच्या गोलंदाजीवर कामरान बाद झाला होता, पण पंचानी नो बॉलचा इशारा दिला आणि कामरान वाचला. तर त्यानंतरच्या चेंडूवर कामरान पुरता फसला होता. यानंतर मग ईशांत आणि कामरानमध्ये बाचाबाची सुरु झाली. अखेर पंच आणि टीम इंडियाच्या खेळाडूंनी मध्यस्थी करत हे प्रकरण शांत केले होते.

सामना संपल्यानंतर याप्रकरणीची आय़सीसीने चौकशी केली होती. त्यानंतर आय़सीसीने भविष्यात असा प्रकार घडू नये म्हणून कारवाई केली असून दोन्ही खेळाडूंना दंड ठोठावला आहे.

Leave a Comment