पीडीत युवतीची मृत्यूशी झुंज सुरूच

नवी दिल्ली: सिंगापूर येथील माउंट एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या बलात्कार पीडित युवतीची प्रकृती मृत्यूशी कडवी झुंज देत असून अद्याप तिची प्रकृती खूपच चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

दिल्ली येथे धावत्या बसमध्ये सामुहिक बलात्काराला बळी पडलेल्या युवतीला बुधवारी रात्री सुसज्ज वैद्यकीय व्यवस्था असलेल्या विमानातून उपचारासाठी सिंगापूर येथे रवाना करण्यात आले. तिच्याबरोबर वैद्यकीय तज्ञांचे पथक आणि तिच्या पालकांनाही पाठविण्यात आले आहे. तिच्या उपचाराचा सर्व खर्च केंद्र शासनाच्या वतीने करण्यात येणार आहे.

माउंट एलिझाबेथ रुग्णालय हे अवयव प्रत्यारोपणाच्या अत्यावश्यक सुविधा आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज रुग्णालय आहे.

Leave a Comment