सैफ झळकणार आता हत्यारासोबत

गेल्या काही दिवसापासून सैफ अली खान हा ‘बुलेट राजा’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. डायरेक्टर तिग्मांशु धूलियाने सैफ अली खानचा रोल प्रेक्षकांना वास्तव दिसावा म्हणून त्याच्या हातात हत्यार देण्यात आले आहे. सैफ हा पहिल्यांदाच ‘बुलेट राजा’ या सिनेमातून हत्यारासोबत झळकणार असल्याने सर्वाना या सिनेमाची उत्सुकता लागली आहे.

तिग्मांशुच्या मते सैफची भूमिका वास्तविक वाट्याला हवी आहे. त्यामुळे त्याने सैफच्या हातात हत्यार दिले आहे. वास्तविक पाहता शूट करताना कोणीच त्यांच्या हातात हत्यार देत नाही. त्याशिवाय आजपर्यंत ओरीजनल हत्यार कोणी पहिले नसेल तर त्यांना या सिनेमाच्या माध्यमातून हत्यार पाहता येणार आहे.

सध्या ‘बुलेट राजा’ या सिनेमाचे लखनऊ मध्ये शूटिंग सुरु आहे. याठिकाणी सैफवर आधारित असलेल्या सीनमध्ये हे हत्यार दाखविण्यात आले आहे. सैफ अली खानने पण या सिनेमाची शूट सुरु असतना या हत्यारचा वापर चांगल्या पद्धतीने केला आहे. त्याने हत्यारचा चागल्या प्रकारे प्रयोग केला आहे. सैफला सुरुवातीपासून हत्यार लोड आणि अनलोड करण्यची कल्पना आहे. त्यामुळे त्याने शूटच्या वेळी काही गडबड केली नाही.