नवीन वर्षानिमित फेविकॉल लावणार सनी

गेल्या काही दिवसापासून नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सध्या जोरात सुरु आहे. २०१३ च्या स्‍वागतासाठी आता दिल्ली तयार झाली असून सर्व ठिकाणी मोठ्या जल्लोशात नवीन वर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे. ३१ डिसेबरच्या रात्री दिल्‍लीमध्ये आपल्या चाहत्याची फोटो डोक्यावर लाऊन डान्स करण्यात येणार आहे. यावेळी फोटोवर फेवीकॉल लावण्याचे काम अभिनेत्री सन्‍नी लियोन करणार आहे.

‘जिस्‍म-२’ या सिनेमातून कारकीर्द सुरु करणारी सन्‍नी लियोनचा पहिला लाइव डान्स शो दिल्‍लीमध्ये ३१ डिसेबर रोजी रात्री होणार आहे. हा शो होटेल ललितमध्ये आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या होटलच्या न्‍यू ईयर सेलेब्रेशनच्या तिकीटाची जोमाने विक्री होत आहे. त्याशिवाय काही खास लोकासाठी पासपण वाटले जात आहेत. कार्यक्रमचे आयोजन स्‍टूडियो १६९ च्या वतीने करण्यात आले आहे.याबाबत अधिक माहिती देताना स्‍टूडियोची शिल्‍पी गुप्‍ता म्हणाली, ‘ सन्‍नी लियोनच्या खास डांस शोने २०१३ या नवीन वर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी महिला डीजे कैरीच्या धुनवर तालीन होउन अनेकजण यावेळी ठेका धरतील.’

दिल्‍लीवासियासाठी ही जरी नवीन गोष्ट नसली तरी सन्‍नी लियोनच्या दृष्टीने महत्‍वपूर्ण बाब आहे.आगामी काळात येत असलेल्या ‘रागिनी एमएमएस-२’ या सिनेमाच्या प्रोमोशनचे काम तिने सुरु केले आहे. सध्या ती ज्याठिकाणी जाते त्यठिकाणी या सिनेमाची चर्चा होते. आगामी काळात जर ‘ रागिनी एमएमएस-२’ या सिनेमला हिट करयाचा असेल तर सन्‍नीला नागरिकाच्या जवळ जाऊन पोहचावे लागणार आहे.

Leave a Comment