गेल्या काही दिवसापासून बॉलीवूडमध्ये सलमानने स्वताचे चांगलेच बस्तान बसविले आहे. त्यामुळे सिनेसृष्टीतील मोठयमोठया मंडळीना सलमानची भेट घेण्यासाठी सुद्धा धडपड करावी लागते. काही दिवसापूर्वीच झालेल्या एका पार्टीत सलमानच्या सोबतच एसआरकेचा खास दोस्त करण जौहर देखील होता. या पार्टीत कारण हा सतत सल्लूच्या पाठीमागे फिरताना दिसत होता. करणाला तसे पहिले तर एसआरकेचा जवळचा माणूस म्हणून ओळखले जाते. पार्टीत सहभागी झालले इतर जन मात्र या दोघामधील जवळीकता पाहून त्यांच्यात काहीतर शिजत असल्याची चर्चा करीत होते.
पार्टी अटेंड करणा-याच्या मते तसे पहिले तर सलमान आणि करण खूप कमी वेळा एकत्र येतात. काही दिवसापुर्वी सलमानने ‘कुछ-कुछ होता है’ या सिनेमात करणा सोबत काम केले होते. मात्र त्यानंतर बरच काळ दोघच एकत्र सिनेमा आला नाही. मात्र गेल्या काही दिवसापासून करण आणि सल्लू प्रत्येक पार्टीत एकत्र दिसत असल्याने सर्वचजन हैराण झाले आहेत.
गेल्या काही दिवसापासून शाहरुख-सलमानच्या चोप्रा कैंपमधून झालेली धमाकेदार एंट्री विसरला नाही. त्यातच आता करण जौहर आणि सल्लूमियाचे सुत चांगलेच जुळले आहे. त्यामुळे आता येत्या काळात करण आणी सल्मानची मैत्री पाहून मात्र शाहरुख खान चांगलाच हैराण होणार आहे.