
पुणे दि.२४- मराठी मनोरंजन सृष्टीतले प्रसिद्ध अभिनेते आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात ठार झाले असल्याचे वृत्त आहे. पुण्याहून शुटींग संपवून मुंबईला परतत असताना तळेगांव टोलनाक्याजवळ विरूद्ध दिशेने येत असलेल्या टेंपोने डिव्हायडर तोडून त्यांच्या वॅगनआर कारला धडक दिली. त्यात पेंडसे जागीच ठार झाले तर अभ्यंकर आणि पेंडसे यांचा दीड वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाले. त्या दोघांना निगडीच्या लोकमान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले व तेथेच या दोघांचाही उपचार सुरू असताना मृत्यू झाला असे पुणे ग्रामीण पोलिसांनी सांगितले. रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला.
