मृत्यू आणि आयकर विभागापासून सुटका नाही: अमिताभ

मुंबई: आयुष्यात दोन गोष्टींना सामोरे जावेच लागते. त्या म्हणजे मृत्यू आणि आयकर विभाग! हे उद्गार आहेत ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांचे!

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमातून बच्चन यांना मिळालेल्या रकमेपोटी त्यांनी १ कोटी ६६ लाख रुपये आयकर भरावा; अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली असून यासंबंधी न्यायालयाने बच्चन यांना नोटीस जरी केली आहे. या संदर्भात बच्चन यांनी हे विधान केले आहे.

सुभाष कपूर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘जॉली एलएलबी’ या चित्रपटाच्या ‘प्रोमो’चे प्रकाशन झाल्यानंतर बच्चन पत्रकारांशी बोलत होते.

Leave a Comment